44 लाखांचा गांजा ग्रामीण पोलिसांनी केला नष्ट ;न्यायालयाच्या निकालानंतर ची कारवाई




सोलापूर - (अकबर बागवान) सोलापूर ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रातील विविध अकरा गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला तब्बल 880 किलो वजनाचा 44 लाख रुपये किमतीचा गांजा   न्यायालयीन निकालानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नष्ट केला आहे.
 बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील मे कीर्ती ॲग्रोटेक लिमिटेड या कंपनीत प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया पार पडली आहे.  सोलापूर ग्रामीण पोलीस आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थ म्हणून ओळखला जाणारा गांजा जप्त केला होता.
 .  याप्रकरणी न्यायालयात गुन्हे दाखल झाले होते न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सदरचा जप्त करण्यात आलेला 880 किलो इतक्‍या वजनाचा गांजा त्याची अंदाजे किंमत 43 लाख 95 हजार इतका कंपनीत   जाळू  नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.   .  सदरची प्रक्रिया पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अरुण सावंत यांच्या देखरेखीखाली   लघु न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचे डॉक्टर संदीप शेट्टी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी भोसले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक हर्षवर्धन शिंदे प्रभारी महसूल नायब तहसीलदार बुक वाले,  तसेच दोन पंचांच्या उपस्थित  वजन करून गांजा नष्ट करण्यासाठी पाठवण्याची प्रक्रिया करण्यात आली.  सदर प्रक्रिया पूर्ण  करण्याकामी राखीव पोलीस निरीक्षक केबी काजळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, डीबी राठोड पोलीस हेडकॉन्स्टेबल आरडी निंबाळे, बांगर, केंद्रे ,जाधव व सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे

Post a Comment

Previous Post Next Post