मोहम्मद पैगंबर - इस्लाम व धार्मिक पंचसुत्रे

मोहम्मद पैगंबर जयंती / ईदमिलादूनबी विशेष 
चांदसाहेब शेख 
इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म ५७१ मध्ये मक्केतील कुरेशी या घराण्यात झाला वयाच्या चाळिसाव्या वर्षी जिब्राईल या देवदूताने त्यांना ईश्वरी संदेश दिला तो संदेश त्यांनी पवित्र ' कुराण शरीफ ' या धर्म ग्रंथात नमूद केला आहे मोहम्मद पैगंबर यांची राहणीमान , वर्तणूक , सभ्यता तथा त्यांची संपूर्ण जीवनशैलीची जडणघडण जशी झाली आहे त्याची इत्यंभूत माहिती ' हदीस ' या नावाने ओळखली जाते पवित्र ' कुराण शरीफ ' प्रमाणे  'हदीस "  ग्रंथास सुद्धा इस्लाममध्ये तितकेच महत्व आहे 
इस्लाम धर्माचे अनुयायी मुस्लिम म्हणून ओळखले जातात इस्लाम धर्माचे ५ मुख्य स्तंभ आहेत त्यामध्ये  १) कलमा  -  लाईलाहाएल्लाहू मोहम्मदरहूं रसूललहा म्हणजे परमेश्वर एकच असून मोहम्मद पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहेत  २) नमाज -  प्रत्येक इस्लाम धर्माच्या अनुयायांनी दिवसातून पाच वेळेस  इश्वराप्रति नतमस्तक व्हावे यालाच नमाज म्हणतात कुठल्याही परिस्थितीत नमाज मध्ये खंड पडू देऊ नये अशी सक्त ताकीद केली आहे ३) जकात -  जकात म्हणजे इस्लाम धर्माच्या अनुयायांनी आपल्या प्राप्तीच्या ( कमाईच्या ) अडीच टक्के दान धर्म करावा जेणेकरून गोरगरीब नागरिकांना याचा लाभ घेता येईल जकात ही सुद्धा बंधनकारक आहे  ४) रोजा  -  पवित्र रमजान महिन्याच्या प्रत्येक दिवशी  महिनाभर निर्जली उपवास करावा यालाच रोजा म्हणतात  ५) आयुष्यातुन एकदा तरी पवित्र मक्केच्या यात्रेस जावे व पुण्य पदरी पाडून घेणे बंधनकारक आहे यालाच हज यात्रा म्हणतात ही यात्रा बकरी ईदच्या पवित्र सनावेळी पार पडते  
याशिवाय इस्लाममध्ये मादक पदार्थांचे सेवन निषिद्ध असून मात्यापित्याविषयी आदर बाळगावा यासह सर्वच शंकाकुशकांचे सविस्तर वर्णन कुराण  - हदीस मध्ये केले आहे 
      इस्लाम धर्म प्रसार करत असताना मोहम्मद पैगंबर यांना मक्केत त्रास देण्यात येत होता यामुळे मोहम्मद पैगंबरानी  मक्केहून मदीनेस स्थलांतर केले यामुळे मक्केसह मदिना या पवित्र  स्थळास विशेष महत्त्व आहे तसेच मोहम्मद पैगंबर यांनी अखेरीचा श्वास मदिना येथेच घेतला आहे

No comments:

Post a Comment