शासकीय वहानांचा खाजगी कामासाठी वापर वाढला... करदात्या जनतेमध्ये नाराजी..
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात शासकीय कर्मचारी आणि अधिकारी आपल्या सरकारी वाहनांचा वापर खाजगी व घरगुती कामाकरीता करीत असल्याने करदात्या जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.

शहरात असलेले डी मार्ट अनेक सर्वच वस्तूंचे भव्य दालन आहे. हे  मुख्य शहराच्या बाहेर असल्याने व वर्दळ नसल्याने शासकीय अधिकारी त्यांच्याकडे असणारे वाहन इकडे येण्यासाठी सहज वापरतात.

दिनांक १ डिसेंबर रोजी पोलीस विभागातील दंगल नियंत्रणासाठी वापरण्यात येणारे वज्र हे वाहन  डिपार्टमेंट मधील एका अधिकाऱ्याची सामानाची खरेदी करण्यासाठी डी मार्ट येथे आणले गेले होते. वज्र नावाच्या गाडीचा वापर वरिष्ठांच्या डोळ्या आड करून वरिष्ठांचा घात करण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.

शासकीय वाहनाचा खाजगी कामासाठी होणारा वापर नवीन नाही मात्र हे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढत चालले आहे. शासकीय खर्च जनतेच्या करातून होतो हे सर्वश्रुत आहे. त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा असते. शासकीय वाहनाच्या वापरावर  नियंत्रण ठेवण्याची मागणी जनतेकडून होत आहे.
मात्र हे वाहन नियमित तपासणीसाठी डी मार्ट परिसरात गेले असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.  

No comments:

Post a Comment