उस्मानाबाद - गुन्ह्याचा तपास करताना श्वान किती महत्वाचे असतात याचा प्रत्यय उस्मानाबाद मध्ये आला. याबाबत हकीकत अशी की, संतोष धुमाळ रा. उंडेगाव ता. परंडा यांच्या घरी ता. १५ रोजी दुपारी दीडच्या सुमारास चोरी झाली. धुमाळ शेतातून घराकडे येत असताना अज्ञात इसम घरातून पळ काढत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी लागलीच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार झाला. त्यानंतर धुमाळ यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातून घरातील ऐवज आणि पैसे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी अंबी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली. या चोरीचा तपास करण्यासाठी आंबी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले.श्वान पथक रात्री ११ वा घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी संशयित आरोपीची व चप्पल मिळून आली असल्याने डॉग हँडलर ढोणे आणि कोरडे यांनी श्वान प्लूटो यास दिला असता श्वान प्लूटो अंदाजे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोपीच्या घरापर्यंत पोहोचला आणि गुन्हा उघडकीस आणला.
No comments:
Post a Comment