दैनिक जनमत : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे- गजानन सुसर

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, December 18, 2019

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे- गजानन सुसर


उस्मानाबाद :-
शिक्षण हे समाजोन्नतीचे सर्वोत्तम साधन असून शिक्षणामूळेच अल्पसंख्याक समाजातील जालना जिल्हयातील रिक्षा चालकाचा मूलगा अन्सार शेख हा आय.ए.एस. होऊ शकला. त्यामूळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे असे उदगार जिल्हा परिषद उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी (माध्य) गजानन सुसर यांनी काढले. ते अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
     याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्रा) सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी (माध्य) रत्नमाला गायकवाड, ऋषिकेश पिंपळे अधिक्षक,  पंचायत विभाग, बालाजी मरे, सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्र उस्मानाबाद महेश ढवळशंख, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग  यांनी अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांची माहिती दिली.
तसेच सिटी प्राईड इंग्लीश स्कूलचे  संस्थापक शब्बीर सय्यद यांनी अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक जनजागृतीसाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे जाहिर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान पर्यवेक्षक तारेख काझी, मीर एजाज अली, मोमीन परवेझ व खाजगी उर्दू शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...