दैनिक जनमत : स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सर्वाना सहभागी करुन घेतले - मकरंद राजेनिंबाळकर

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Friday, December 13, 2019

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सर्वाना सहभागी करुन घेतले - मकरंद राजेनिंबाळकर

उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरात स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून भित्तीचित्र स्पर्धा घेण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण केवळ नगरपालिकेपुरते मर्यादीत न रहाता सर्व समाज घटकांना सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले.
२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भित्तीचित्र स्पर्ध्येचे बक्षीस वितरण सोहळा आज शहराचे विद्यमान नगराध्यक्ष यांच्या ऑफिसमध्ये संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष निंबाळकर बोलत होते. सदर स्पर्धेचे आयोजन उस्मानाबाद नगरपालिका आणि ग्रीनी संस्थे मार्फत करण्यात आले आहे. ग्रीनी द ग्रेट पर्यावरणीय जीवनशैलीचा कृतीशील प्रचार करणारी व्यावसायिक संस्था असून उस्मानाबाद नगरपरिषदेने घनकचरा वर्गीकरणा संदर्भात सर्वेक्षण, जनजागृती आणि पाठपुरावा करण्यासाठी संस्थेची नेमणूक केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत ग्रीनी टीम द्वारे  शहरात घनकचरा विषयी जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रम शहरात घेतले जातात.
भित्तीचित्र स्पर्द्येसाठी शहरातील शाळा विद्यालयातील एकूण ४० विद्यार्थांनी या स्पर्द्येत सहभाग घेतला होता. या स्पर्ध्येत सहभागी स्पर्धकांनी आकर्षक असे संदेश देणारे चित्र काढली होती, त्यात परीक्षकांना मार्फत निवडलेल्या चित्रांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन विद्यार्थांना सन्मानित करण्यात आले. 
ग्रीनी द ग्रेट चे प्रकल्प व्यवस्थापक अमोल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच पुढे घेण्यात येणार्‍या भित्तीचित्र स्पर्ध्येत जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. 
छत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भित्तीचित्र स्पर्ध्येदरम्यान आलेले अनुभव मांडले व नागराध्य यांच्याकडे अशा प्रकारचे कार्यक्रम पुढेही व्हावे अशी विनंती केली. 
कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी,  स्वप्नील चव्हाण, आरोग्य निरीक्षक - कांबळे , सिटी कॉर्डिनेटर  पडवळ सर, रोटरी क्लब चे सुधाकर भोसले, क्रीडाई चे प्रदीप मुंढे, अजय सुर्यवंशी, पवार, गरड. जी.जी,  भुतेकर आर. जी. नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रीनी टीम उपस्थित होती