छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर हे अजिंक्य योद्धे - राम जवानतुळजापूर - छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर हे
अजिंक्य योद्धे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते राम जवान यांनी मांडले. खडकी येथे छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती उत्साहात  साजरी करण्यात आली.प्रथमता प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
पुढे बोलताना  राम जवान  म्हणाले की छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे झाला घरात लहान पणापासुन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे समाजकारण व देशभक्ती पाहुन यशवंतरावांना लहानपणापासून देशभक्ती व अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे घरातुनच मिळाले.यशवंतरावांनी आठराशेच्या सुरुवातीस पुण्यावर हजारो सैन्य सोबत घेऊन स्वारी केली होती, हे युध्द यशवंतराव व पेशवे यांच्यात पुण्यातील वानवाडीच्या मैदानावर लढले गेले. या लढाईत पेशवे हरले व पळुन पेशवे सातार्याला गेले. यावेळी पुण्यामध्ये एवढा मोठा नरसंहार होता कि हाडे पसरण्यास जागा नव्हती म्हणून पुण्यातील आजचे हडपसर हे नाव त्यावेळच्या घटनेवरूच पडले आहे.छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड करून इंग्रजांना तब्बल अठरा वेळा पराभूत करून इंग्रजांची अभ्रु जगाच्या वेशीवर टांगली. इंग्रजांनी जगावर राज्य केले परंतू यशवंतराव होळकर यांच्या कडुन इंग्रजांना तब्बल अठरा वेळा पराभव स्वीकारावा लागला. आठराशे एक सुमारास भारत देशात सर्वात मोठी फौज व तोफखाना म्हणजेच एक लाखापेक्षा जास्त सैन्य यशवंतराव होळकर यांच्या कडे होता.त्यावेळी भारतात ऐवढे सैन्य कोणत्याही राजाकडे नव्हते. अशा या महान योध्दाने भारत भुमी इंग्रजांच्या ताब्यातून मिळवण्यासाठी उभं आयुष्य देशासाठी अर्पण केले.
यावेळी भरत जवान,सिध्दु सुरवसे,किशोर जवान,संभाजी शिंदे उमेश जवान,आविनाश जवान,राम जवान,भुताळी बनसोडे,आकाश जवान,संदेश जवान,मलिक कवडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

1 Comments

  1. खुप खुप अभिनंदन....
    त्यांचे विचार प्रत्येकांच्या घरामधे पोहचले पाहिजे...!

    ReplyDelete
Previous Post Next Post