नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध सत्कार करताना मात्र प्लास्टीकचा पुष्पगुच्छ?

नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध
सत्कार करताना मात्र प्लास्टीकचा पुष्पगुच्छ?

उस्मानाबाद/प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासुन रिक्त असलेल्या उस्मानाबाद नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवडी अखेर शुक्रवारी पार पडल्या. भाजपयुक्त राष्ट्रवादीने विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करत वर्चस्व सिध्द करुन नगरपालिकेत आपली जागा पक्की केली. मात्र चर्चा होती सभापती निवडीनंतर सत्कार करताना दिलेल्या पुष्पगुच्छाची, पुष्पगुच्छात फुलांसोबत असलेल्या प्लास्टीकची.


महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यापासुन प्लास्टीक वापरावर बंदी आहे. प्लास्टीक वापरणार्‍यावर नगरपालिकेने कारवाया करत दंड वसुल केला आहे. मात्र उस्मानाबाद नगरपालिकेच्या नुतन विषय समित्यांच्या सभापतींचा सत्कार करताना मात्र प्लास्टीक असलेला पुष्पगुच्छ वापरल्याने तसेच तो पुष्पगुच्छ आणताना भली मोठी प्लास्टीकची पिशवी वापरल्याने सामान्यांना वेगळा न्याय आणि प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय असतो का? अशी चर्चा नगरपालिकेत सुरु होती. विशेष म्हणजे हा सत्कार खुद्द  जिल्हाधिकार्‍यांनी निवडणुकीसाठी प्राधिकृत केलेल्या उपविभागीय दंडाधिकारी रामेश्‍वर रोडगे, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते आणि समक्ष करण्यात आल्याने चर्चेला उधान आले आहे.
शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया अध्यक्षांच्या दालनात सुरु झाली. भाजप आणि राष्ट्रवादी मिळुन २३ असे संख्याबळ होत असल्याने शिवसेना, कॉंग्रेस आणि विधानसभा निवडणुकीवेळी शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीने अर्ज भरणे टाळले. सभेला सुरुवात होताच समितीवर किती सदस्य असावे. यावर विचार विनिमय करुन १३ सदस्य संख्या निश्‍चित करण्यात आली. प्रत्येक विषय समिती सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने सात समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली.  स्थायी समितीचे नगराध्यक्ष हे पदसिध्द सभापती असतात. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राणी दाजी पवार, उपसभापती पदी अनिता पवार. आरोग्य व स्वच्छता विठाबाई पेठे, शिक्षण समिती राजकन्या अडसुळ, पाणि पुरवठा अंजना पवार, बांधकाम समिती युवराज नळे तर नियोजन समितीच्या सभापती पदी नगरपालिकेचे उपाध्यक्ष अभय इंगळे यांची निवड झाली आहे.

No comments:

Post a Comment