लोकशाहीत मालकाला नोकराने माहिती दिली पाहिजे- दिलीप धारूरकर

उस्मानाबाद- लोकशाहीत मालकाला नोकराने माहिती दिली पाहिजे असे स्पष्ट मत दिलीप धारूरकर राज्य माहिती आयुक्त औरंगाबाद खंडपीठ यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. माहिती अधिकार कायद्याबाबत कार्यशाळा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि सार्वजनिक प्राधिकरण यांच्या सोयीसाठी राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर उस्मानाबाद येथे आले होते 28 व 29 जानेवारी रोजी प्रत्येकी दीडशे अपिलांची सुनावणी राज्य माहिती आयुक्त यांनी घेतली या सर्व सुनावण्यासाठी अपीलार्थी व जन माहिती अधिकारी तसेच प्रथम अपीलीय अधिकारी यांनी व्यक्तीश: उपस्थित राहून आपली बाजू मांडली. त्यानुषंगाने आयुक्तांनी लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेऊन सर्व द्वितीय अपिलावर आदेश पारित केलेले आहेत. तसेच माहिती अधिकार कायद्याचा प्रभावीपणे वापर केल्यास लोक कल्याणकारी राज्य निर्माण होईल असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी रा. चो. सरवदे उपसचिव राज्य माहिती आयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment