जि.प.सदस्या सलगर यांची कनगरा गावास सदिच्छा भेट.

कनगरा/प्रतिनिधी
                उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथे जि.प.सदस्या सक्षणा सलगर यांनी भेट देवून विविध समस्यांवर चर्चा केली.
           यावेळी गावकर्‍यांनी शेतरस्त्याच्या समस्या,बाजार चौकात सिमेंट रस्ता बनवावा,पशु वैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम मंजूर असून काम चालू करण्यात यावे,आरोग्य उपकेंद्रात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांची हेळसांड होत असून औषधांचा पुरवठा करण्यात यावा,महादेव मंदाराच्या कुंपनासाठी निधी द्यावा तसेच तरुणांना व्यायाम शाळा देण्यात यावी अशा विविध समस्या गावकर्‍यांच्या वतीने मांडण्यात आल्या.
                गावकर्‍यांच्या समस्यांवर उत्तर देताना सलगर म्हणाल्या,ग्रामपंचायतीचे ठराव घेतल्यास सर्व समस्या प्रामाणिकपणाने मार्गी लावणार असून,गावच्या विकासासाठी जे-जे शक्य होईल ते करणार असल्याच त्या यावेळी म्हणाल्या.
                यावेळी ग्रा.पं.सदस्य जगन्नाथ इंगळे,,ग्रा.पं.सदस्य शिराज शेख,विजय पाटील,महेबुब शेख,संजय इंगळे,मनोज धाराव,खलील शेख,अॅड अजय पाटील आदिंसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment