कनगरा-प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील श्री हणमंतराव पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.
प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याद्यापक पाटील जी.एम.म्हणाले,चंदना प्रमाणे झिजून विद्यार्थ्यांनी भविष्यात स्वतःचा व शाळेचा नावलौकिक करावा.शाळा ही रोपवाटिका असून त्यातील छोटी रोपटी हे विद्यार्थी असतात.रोपवाटिकेतील रोपटी आता मोठी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीला जास्त वाव मिळावा म्हणून हा निरोप आहे.
तसेच शाळेबद्दलच्या भावना व्यक्त करताना श्रृष्टी जगताप विद्यार्थीनी म्हणाली,भव्य अशा वटवृक्षरुपी शिक्षकांच्या सावली खाली आम्ही वाढलो असून सर्वोत्तम शाळा व शिक्षक आम्हाला लाभले याचा कायम अभिमान राहिल.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लातूर माध्य.विभागाचे मा.उपाध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले,स्वतःच्या क्षमता ओळखून मेहनत घेतल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नाही.मुली सर्वच क्षेञात अव्वल असून घरातून चालना मिळाल्यास त्या भविष्यात नाव करतील असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुञसंचालन ढोणे जी.बी.यांनी,तर आभार श्रीम.पवार ए.एस यांनी मांडले.यावेळी संस्थेचे सचिव विजय पाटील,श्रीम.गवाड ए.एस.,बनसोडे व्ही.बी.,काळे.ए.एस.,श्रीम.मुटकुळे के.बी.,भांगे बी.एम.,घाढगे डी.एल.आदि शिक्षकांसह गायकवाड एन.जी.,बंडगर एम.डी.आदि शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.