दैनिक जनमत : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सचिव पदी धीरज घुटे यांची निवड

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Thursday, February 13, 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सचिव पदी धीरज घुटे यांची निवड

पाडोळी
उस्मानाबाद तालुक्यातील आरणी गावचे रहिवाशी असलेले आणि कर्जत जामखेडचे आमदार यांचे अत्यंत विश्वासु कार्यकर्ते  धीरज घुटे यांची नुकतीच मोहोळ (जि. सोलापूर) येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी निवड करण्यात आली आहे. 
    मोहोळ येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आकाश पाटील, ऋषिकेश ठोंबरे पाटील यांनी धीरज घुटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
यापूर्वी धीरज घुटे यांनी पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी पुणे विद्यापीठात मोठे योगदान दिले आहे. मागील सहा वर्षांपासून ते पक्ष वाढीसाठी मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांना आज पार्टीच्या वतीने राज्यवर काम करण्याची पक्षनेता मंडळीने जबाबदारी दिली आहे. धीरज घुटे यांच्या निवड झाल्यामुळे उस्मानाबाद शहरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाली ३ कोटींची थकहमी

  धाराशिव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद, नांदेड व मुंबई या बँकांनी सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासना...