"गाव कृती आराखडा" गावाची पाण्याची गरज पूर्ण करणारा बनवावा - जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे



उस्मानाबाद - जिल्हयातील प्रत्येक गावांनी गावातील लोकांचे जीवनमान सुलभ होईल यादृष्टीने गावातील सर्व शिवकालीन पाणी साठवण योजनांचे
बळकटीकरण करून व नवीन योजनांचा अंतर्भाव करून आणि पाणीसाठे निर्मितीसाठी
पुनर्भरण करण्यावर भर देणारा 'जल जीवन मिशन' कार्यक्रमांतर्गत परिपुर्ण "गाव कृती
आराखडा" बनवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुजल व स्वच्छ गावाची संकल्पना स्पष्ट होणे व जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींचे "गाव कृती आराखडे" बनविणेसाठी, जिल्हास्तरावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,जि.प.उपाध्यक्ष श्री.धनंजय सावंत,कृषी,पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती श्री.दत्तात्रय साळंके,महिला व बालकल्याण सभापती श्रीमती रत्नमाला टेकाळे,उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री.अनंत कुंभार,कार्यकारी अभियंता (ग्रापापु) श्री.दशरथ देवकर, कार्यकारी अभियंता (मजिप्रा.).डि.आर.पांडव,वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.ठाकर, जिल्हा आरोग्यधिकारी श्री.हनुमंत वडगावे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुढे बोलताना  अस्मिता कांबळे म्हणाल्या
की,पडणा-या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविला पाहिजे, तरच जमिनीतील पाणी
पातळी वाढु शकते. त्याचबरोबर वैयक्तिक विहिरीची योजना घेत असताना विहिरीचे
पुर्नभरण ही झाले पाहिजे, याविषयी अधिकारी व कर्मचा-यांनी नागरिकांना महत्व पटवून
सांगणे आवयश्क असल्याचे निदर्शनास आणून, शासकीय यंत्रणांनी त्याप्रमाणे कार्यवाही
करावी अशा मौलीक सूचना उपास्थित अधिका-यांना केल्या. या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी ही 'जल जीवन मिशन' च्या अंमलबजावणीची कार्यपध्दती व मार्गदर्शक सुचनानुसार सन २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक/घरगुती
नळजोडण्याद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करुन देण्याचे उदिष्टे आहे. याकरिता 'गाव कृती
आराखडा व जिल्हा कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. यावेळी जि.प.चे कृषी,पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती श्री.दत्तात्रय साळके यांनी सदर प्रशिक्षणातील मौलिक विषयातील ज्ञानाच्या शिदोरीचा वापर गाव कृती आराखडा बनविण्यासाठी उपयोगी आणावा अशा सूचना उपस्थित अधिकारी यांना केल्या. कार्यशाळेत प्रस्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)अनंत कुंभार यांनी केले. या कार्यशाळेसाठी युनिसेफचे प्रतिनिधी बालाजी व्हर्रकट,प्रायमुव्ह संस्थेचे
प्रतिनिधी मंगेश भालेराव,विभागीय समन्वयक अरुण रसाळ या साधन व्यक्तींनी 'गाव कृती आराखडा" निर्मितीची प्रकिया व 'सुजल व स्वच्छ' गाव संकल्पना सहभागी
अधिकारी व कर्मचारी यांना समजावून सांगितली.सदर कार्यशाळेत जिल्हयातील सर्व गटविकास अधिकारी,उपअभियंता
(मजिप्रा/ग्रा.पा.पुं),तालुका वैदयकीय अधिकारी,विस्तार अधिकारी (पं),विस्तार
अधिकारी(आरोग्य),शाखा अभियंता सर्व,कनिष्ठ अभियंता (पा.पु.),व्ही.एस.टी.एफ चे
ग्रामपरिवर्तक,प्रत्येक तालुक्यातुन १० ग्रामसेवक,पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे पाच
अध्यक्ष उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
कक्षातील सल्लागार व गट संसाधन केंद्रातील समन्वयकयांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment