दैनिक जनमत : गावातील अडी अडचणीबाबत सहाय्यता कक्षाच्या कर्मचार्‍यांना अवगत करावे - आ. राणाजगजित सिंह पाटील

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Thursday, March 26, 2020

गावातील अडी अडचणीबाबत सहाय्यता कक्षाच्या कर्मचार्‍यांना अवगत करावे - आ. राणाजगजित सिंह पाटील


उस्मानाबाद:- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना राबविण्यासाठी ग्रामस्तरावर कोरोना सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. अनेक गावांमध्ये सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून चांगले काम करण्यात येत आहे. या कक्षाच्या माध्यमातून बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती कळविणेआजारी व्यक्तींची माहिती कळविणेगावांमध्ये औषधेकिराणाभाजीपालापिण्याचे पाणीलाईट या सुविधांच्या उपलब्धते बाबत देखील काही अडचणी आहेत का याबाबींचा दैनंदिन आढावा घेऊन माहिती  प्रशासनाला कळविणे अभिप्रेत आहे. 

परंतु अशा गंभीर परिस्थितीत देखील काही गावांमधून सहाय्यता कक्षाचे कर्मचारी गावी येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. या भयावह परिस्थितीत सर्वांनी जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. कोरोना सहाय्यता कक्षातील कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. या बिकट परिस्थितीत गावातील अवैद्य धंद्यात वाढ होत असल्याच्या देखील तक्रारी ग्रामस्थांकडून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सहायता कक्षाच्या सदस्यांनी गावातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी बाबत संबंधित तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना दररोज  Whatsapp अथवा ई मेल द्वारे अवगत करण्याबाबत आदेश देण्याचे आ. राणाजगजित सिंह पाटील साहेब यांनी सूचित केले होते.

या अनुषंगाने आज झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्स मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांना सूचित केले आहे. त्यामुळे गावातील अडी अडचणी बाबत सहाय्यता कक्षाच्या कर्मचार्‍यांना अवगत करावे असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी ग्रामस्थांना केले आहे व याउपरही अडचणी दूर न झाल्यास ८८८८६२७७७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाली ३ कोटींची थकहमी

  धाराशिव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद, नांदेड व मुंबई या बँकांनी सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासना...