वंदना धुमाळ-कदम यांचे कार्य ग्रामीण भागातील स्त्रियांना प्रेरणादायी


स्त्री ही आदीमाया शक्ती आहे ,सामर्थ्याची जननी आहे. पराक्रमाची प्रेरणा आहे. मोडका तोडका संसार उभा करणारी कुटुंबातील फार मोठा आधार आहे. संस्कारक्षम पिढी घडवणारे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे स्त्री आहे.प्रत्येक महापुरुषांच्या कार्यात सामर्थ्यशाली स्त्रीची समर्थ साथ असतेअसे म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी माँसाहेबा जिजाऊ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात समर्थ साथ देणारी सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोडका तोडका संसार उभा करणारी माता रमाई ,मेरी झांशी नहीं दुंगी म्हणून इंग्रजासी लढणारी राणी लक्ष्मीबाई ,लोकमाता आहील्यादेवी होळकर आशा कितीतरी सामर्थ्यवान महिला होऊन  गेल्या.एकंदरीत स्त्री शक्तीचा महीमाच वेगळा आहे. हे आता समाजमनाने मान्य केल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच एके काळी चुल आणि मुल इथपर्यंतच मर्यादीत असलेली स्त्री आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे आज सक्षमपणे काम करताना दिसतात.
यात ग्रामीण भागातील स्त्रिया देखील मागे नाहीत. हे वंदना धुमाळ-कदम यांच्या कार्यातून जानवते.
     वंदन किशोर धुमाळ-कदम यांनी बी.एस्सी.  पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सन २००५ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वहाक म्हणून सेवेत रूजू होऊन आज यशस्वीपणे काम करताना दिसतात.सुरुवातीला परभणी आगारात नेमनुक झाली.काही काळ तेथे नोकरी करून त्यांनी तुळजापूर आगारात बदली करून घेतली. सध्या तुळजापूर आगारात गेली दहा बारा वर्ष झाली अविरतपणे सेवा करतात. आक्कलकोट तुळजापूर तालुक्याच्या सिमा रेषा जवळ तुळजापूर तालुक्यातील वागदरी हे त्यांच गाव .लोहारा येथील कदम घराने हे त्यांच माहेर आहे. वागदरी येथील त्या एकमेव वहाक म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत. पती किशोर धुमाळ यांचा जीप चालविण्याचा व्यवसाय.ओंकार आणि श्रीकार आशी दोन मुल त्याना आहेत.एक मुलगा औषध निर्माण शाखेत शिक्षण घेत असून दुसरा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.आपला संसारम सांभाळून त्या कामगार संघटनेतहीसक्रिय सहभागी आहेत. इंटक काँग्रेस या कामगार संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून सक्षमपणे नेतृत्व करतात. संसार, नौकरी सांभाळून  मिळलेला वेळ सामाजिक कार्यासाठी देतात. एकुनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन २०१७ मध्ये रत्नागिरी येते त्यांना राज्यस्तरीय  गुणीजन  कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेआहे.
  दि.०८ मार्च जागतिक माहिला दिनाच्या निमित्ताने त्यांना व आशा सर्व कर्तबगार महिना हार्दिक शुभेच्छा.

        

No comments:

Post a Comment