सोलापूरात आणखी १० जण कोरोना पॉझिटिव्ह


-
सोलापूर (प्रतिनिधी) सोलापुरातील कोरोनाचे आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात तेलंगी पाच्छा पेठेतील महिलेच्या संपर्कातील नऊ जणांचा समावेश आहे.एक व्यक्ती किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.
हे सर्वजण सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल आहेत.या महिलेच्या घराजवळचा एक किलोमीटरचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे
    जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या रिपोर्ट नुसार सविस्तर सांगायचे झाल्यास,   16 एप्रिल गुरुवारच्या दुपारी आलेल्या रिपोर्टनुसार म्हणजे आता दुपारी आलेल्या रिपोर्टनुसार ज्या दहा व्यक्तींचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत  त्या पैकी नऊ कोरोना पॉझिटिव व्यक्ती या खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सच्या संपर्कातील आहेत.  या नऊ व्यक्ती तेलंगी पछा पेठ परिसरातील आहेत.   तर दहावा कोरोना पॉझिटिव व्यक्ती हा मृत किराणा दुकानदाराच्या संपर्कातील असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.
.ती प्रथम कोरोना पॉझिटिव आढळलेली महिला तसेच त्यांच्या संपर्कातील आता दुपारी आलेल्या इतर दहा व्यक्ती असे एकूण अकरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात आहेत.   त्यामुळे कोणीही घाबरू नये घरातच राहावे मास्कचा वापर करावा व आपले  हात वारंवार साबणाने धुवावेत हे काही शंका व काही लक्षणे दिसत असल्यास जिल्हा आरोग्य प्रशासनास तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
 आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्ण आहेत.  आत्ताच्या आलेल्या रिपोर्टनुसार दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या इतर संपर्कातील व्यक्तींचाही जिल्हा प्रशासन शोध घेणार आहे त्यामुळे  नागरिकांनी जिल्हा प्रशासनास आरोग्य प्रशासनास महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.
या सर्वाच्या शेवटी सांगायचे झाले असल्यास  खाजगी हॉस्पिटल मध्ये काम करणारी जी महिला नर्स पॉझिटिव्ह आढळली आहे त्याच्या संपर्कातील 22 पैकी नऊ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 
 व हे सर्व व्यक्ती तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील आहे.
कोरोना पॉझिटिव्ह या सर्व व्यक्तींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहेत कोणीही घाबरू नये अफवा पसरू नये आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.  जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे  असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post