दिलासादायक; उस्मानाबाद 'त्या' तिघांचे अहवाल निगेटिव्ह, आजपर्यंतचे सर्व स्वॅब चाचणी अहवाल निगेटिव्ह


उमरगा( प्रा.युसुफ मुल्ला) : उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा व लोहारा तालुक्यात कोरोना विषाणु्चे प्रादुर्भाव झालेले तीन  रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती.  पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकासह सर्व व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. १४ एप्रील पुर्वी पर्यंतचे सर्व चाचणी अहवाल निगेटीव्ह आले होते. मात्र १४ एप्रीलचे ५,  १५ एप्रील चे २ व १६ एप्रिल चे ७ असे एकुण  १४ जनांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नव्हते. या चौदा जणांच्या अहवालामध्ये 'त्या' तिन पॉजिटीव्ह रुग्णांचे परत घेण्यात आलेल्या स्वाबचे अहवाल येणार असल्याने याकडे जिल्हयासह राज्याचे लक्ष लागले होते.
        पुणे येथे तपासणीसाठी स्वॅब पाठवल्यापासुन  साधारण दुसऱ्या दिवशी रात्री पर्यन्त चाचनी अहवाल प्राप्त होत होते . परंतु नंतर सोलापुर येथे तपासणीची सोय करण्यात आली.  मागील दि. १४ पासुन  दि .१७ पर्यन्त चे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झाले नव्हते . सोलापुर येथे १० नवीन रुग्ण आढळल्या पासुन तपासणी साठी ताण वाढल्याने विलंब होत असल्याची चर्चा होत आहे .
आजपर्यंत एकुण १७१ जणांचे स्वाबचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी १५५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. कालपर्यंत १४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत होते. रात्री उशीरा सर्व १४ जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहीती मिळाली. ही वार्ता उमरग्यात वाऱ्यासारखी पसरली. ही माहीती समजताच अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. उमरगा कोरोना हॉस्पिटलचे हे मोठे यश आहे. त्या रुग्णावर चांगल्या पध्दतीचे उपचार देण्यात आल्याने हा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच या रुग्णांची आणखी एक चाचणी होणे बाकी आहे. त्याचा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या रुग्णांसाठी परीश्रम व काळजी घेणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पी.आर.पुरी, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. जगताप यांच्यासह त्या रुग्णांच्या संमंधीधीत इतर डॉक्टर, व्यवस्थेसाठी असणाऱ्या नर्स व इतर सहाय्यकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पंतप्रधान यांनी जाहीर केलेले लॉक डाऊन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे हे यश आहे.
मात्र  सोलापूर येथे नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्या दृष्टीने प्रशासन काय खबरदारी घेते याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post