तासगाव प्रतिनिधी (राहुल कांबळे)
सांगली महापालिका क्षेत्रातील विजयनगर येथे राहणारा व सांगली शहरातील एका सहकारी बँकेत नोकरी असणारा एका इसमास निमोनिया चा त्रास जाणवू लागल्याने त्याला १७ एप्रिल रोजी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्या हालचाली गतिमान करत सदरचा रुग्ण ज्या विजयनगर भागात राहतो तो संपूर्ण भाग सिल केला आहे. इस्लामपूर येथील एकाच कुटुंबाशी संबंधित २६ रुग्ण कोरोना बाधित होते. त्यापैकी २५ रुग्णांची अंतिम चाचणीही निगेटिव्ह आली असल्याने प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला होता परंतु त्यातच सांगली शहरांमध्ये नवा कोरोना सापडल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे त्या व्यक्तीच्या घरातील व इतर संपर्कात कोणी आला असेल त्यासाठी प्रशासनाकडून योग्य तपासणी सुरू आहे. त्यामुळे सांगली शहर व परिसर सील करून प्रशासनाने सर्व हालचाली गतिमान केल्या आहेत.