आम्हाला धान्य द्या, शिवसेना कार्यालयाबाहेर महिलांचा ठिय्या
उस्मानाबाद - आमच्याकडे रेशन कार्ड नाही आमची लेकरं बाळ उपाशी आहेत आम्हाला धान्य द्या अशी मागणी करत शहरातील अमृत नगर भागातील ३० ते ४० महिला जिल्हा शिवसेना कार्यालयाच्या बाहेर २ तास ठिय्या मांडून बसल्या होत्या.
याबाबत माहिती अशी की सध्या कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी आहे.अनेकांच्या हाताला काम नाही. शहरात रोजी रोटी क मवण्यासाठी मजुरी, धुणीभांडी करणाऱ्या महिलांचे हाल होत आहेत. अश्याच काही महिला आम्हाला धान्य द्या या मागणीसाठी नगरपालिकेच्या जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयासमोर जमा झाल्या तिथे येण्या पूर्वी त्या खासदार ओमराजे यांच्या कडे गेल्या होत्या मात्र त्यांना तुम्ही नगरपालिकेकडे जा असे सांगण्यात आल्याने त्या शिवसेना कार्यालयासमोर आल्याचे उपस्थित महिलांनी  सांगितले. जमा झालेल्या महिलांना विचारले असता त्या आम्ही स्वतःहून आल्याचे सांगितले. आमच्याकडे रेशन कार्ड नाही. हा रोग आला नसता तर आम्ही काम करून खाल्लं असतं. रेशन देता येत नसेल तर उस्मानाबाद चालू करा आम्ही काम करून खाऊ असे महिलांचे म्हणणे होते. त्यानंतर नगरपालिकेतील कर्मचारी सांगळे आणि त्यांचे दोन सहकारी तिथे आले त्यांनी त्या महिलांची यादी बनवून त्यांचे आधारकार्ड व्हॉट्स अप वर पाठवण्यास सांगितले आणि ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही आश्याना धान्य देण्याची ग्वाही दिली यानंतर महिला तेथून उठून आपापल्या घराकडे गेल्या.

https://youtu.be/oRU-bH5Nlsg

Post a Comment

Previous Post Next Post