खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न; संबंधित २१ जण कडेगाव येथे इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्येतासगाव प्रतिनिधी ( राहुल कांबळे)
खेराडे वांगी, तालुका कडेगाव येथील एक व्यक्ती मुंबई येथे रिक्षा ड्रायव्हरचे काम करत होती. या व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला. त्यांच्या पार्थिवावर खेराडे वांगी येथे दिनांक 19 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती  मुंबई महापालिकेतर्फे दिनांक 22 एप्रिल रोजी आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने गतिमान हालचाली करून या व्यक्तीशी संबंधित २१ जणांना कडेगांव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रात्री ठेवले आहे. या सर्वांचे स्वाब घेण्यासाठी आरोग्य पथक कडेगावला सकाळी रवाना झाले आहे.आशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

No comments:

Post a Comment