जत/प्रतिनिधी :
नवाळवाडी ता.जत येथील विवाहितेने दोन मुलासह विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरूवारी उघडकीस आली.
बेबीजांन इब्राहिम नदाफ (वय 32),जोया इब्राहिम नदाफ (वय 5),सलमान इब्राहिम नदाफ (वय 3)असे मुत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
बेबीजान यांचे कर्नाटकातील विजापूर हे माहेर आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.याप्रकरणी फिर्याद पोलीस पाटील अविनाश पाटील यांनी दिली आहे.
जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शवविच्छेदणासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात तिघांचे मृतदेह आणण्यात आले.मातेसह दोन मुलांसह आत्महत्येचा प्रकार घडल्याने नवाळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच लहान मुलांच्या मृत्यूमुळे हळहळही व्यक्त होत आहे.