वादळी वाऱ्यासह पाऊस; सोलापूर ,उस्मानाबाद जिल्ह्यात मोठे नुकसान हिंगणीत द्राक्ष बाग भुईसपाट

सोलापूर - अवकाळी पावसाने सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप येथे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले विजेचे पोलही कोसळले होते. तर उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथेही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हिंगणी (पा)येथील द्राक्ष  उत्पादक शेतकरी राजेंद्र गव्हाणे यांची द्राक्ष बाग वादळी वाऱ्या व मुसळधार पावसामुळे भुईसपाट झाली आंदाजे 8 ते 9 लाख रुपये नुकसान झाले आहे.
देशावर आलेले कोरोनाच संकट व वाढणारा संसर्ग लक्षात घेत देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.त्यामुळे द्राक्षसह सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत. एकिकडे कोरोनाच संकट व दुसरीकडे निसर्गाची मारा यामध्ये शेतकरी अडकला आहे.हिंगणी गावचे तलाठी मिलिंद सावंत,कृषी सहाय्यक विनोद जगदाळे,पोलीस पाटील सुर्यकांत पाटील यांनी द्राक्ष बागेत जाऊन पंचनामा केला.
पळसप येथे घरांचे झालेले नुकसान

वाघोली तालुका उस्मानाबाद येथे जलमय झालेली शेती

Post a Comment

Previous Post Next Post