लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांकडील मालाची माहिती थेट ग्राहकाला तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांचा नाविन्यपूर्ण उपक्रमउमरगा -अमोल पाटील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संबंध देश, राज्य तथा तालुक्यामध्ये शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे .वर्षानुवर्ष दुष्काळ, अतिवृष्टी ,गारपीट ,रोगराई अशा अडचणींना सातत्यपूर्ण सामोरे जात असलेल्या शेतकऱ्यांना या कोरोणा विषाणूमुळे निर्माण झालेल्या संचारबंदी परिस्थिती शेतात उत्पादित केलेला माल वाहतूक बंद असल्याने व व्यापारी कमी किमतीला माल घेत असल्याने असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .
       तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून शेतामध्ये भाजीपाला ,फळे याचे उत्पादन घेऊन त्यातून काही नफा कमावता येतो का या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांना व्यापारी मात्र पीळून खात आहेत . कुणाची कलिंगड, कुणाची फुले ,तर अनेकांची द्राक्षे, फळभाज्या उठाव नसल्याने जागेवर वाळत असल्याचे  चित्र आज मितीला निर्माण झाले आहे .अनेक शेतकऱ्यांनी शासनाकडून यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे .तर अनेकांनी अनुदानाची मागणी केली आहे.
     उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा .गरजवंत ग्राहकाला चांगल्या प्रतीचा माल मिळावा शेतकरी व ग्राहका मधील दुवा असणारा व्यापारी दोन बोक्या तील भांडणात माकडाच्या भूमिके प्रमाणे मलीदा सातत्यपूर्ण स्वतःच लाटत राहतो . याला आळा घालण्यासाठी तसेच संचार बंदीच्या काळामध्ये अनेकजण गरजवंत लोकांना विविध माध्यमातून धान्याचे किट ,भाज्या, फळे इत्यादी माध्यमातून मदत करताना दिसत आहेत . तो माल खरेदी करताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यास त्याला योग्य भाव मिळतो व घेणाऱ्याला चांगल्या प्रतीचा माल उपलब्ध व्हावा हा उद्देश समोर ठेवून उमरगा येथील तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांनी उमरगा लोहारा तालुक्यामध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम चालू केला आहे . या तयार करण्यात आलेला यादी मध्ये कृषी खात्यामार्फत सर्व शेतकऱ्या जवळील उपलब्ध मालाची माहिती गोळा केली जाते तसेच शेतकऱ्यांचा संपर्क क्रमांक, गाव, मालाची प्रत, इत्यादी बाबी त्यात उल्लेख केल्या जातात व ती यादी व्हाट्सअप ग्रुप, सोशल मीडिया, ग्रामीण भागातील शेतकरी गटे विविध शासकीय  व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे  ग्रुप, कृषी सेवक यांचे व्हाट्सअप ग्रुप यांच्यामार्फत व्हायरल केली जाते . ज्यामुळे आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या मालाची माहिती सर्व नागरीक, गरजवंत ,व्यापारी ,हॉटेलचालक, गरजवंतांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्था तथा शासनामार्फत मदत करणाऱ्या एजन्सिज यांना ही माहिती जाते व या माध्यमातून शेतकऱ्यांना मालाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकाला ताजा भाजीपाला फळे उपलब्ध होतील .
अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमाला ग्राहकांनी प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेल्या या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी सहकार्य व्हावे हीच माफक अपेक्षा .
       
---------------
आज अखेर माझा बळीराजा दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा अनेक संकटांना तोंड देत आलेला आहे. त्यातच सध्या जगामध्ये कोवड १९ हा विषाणू थैमान घातलेला आहे. या विषाणूला वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने लॉक डॉउन व संचारबंदीसारखी उपाययोजना करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडील फळे व भाजीपाला यासारखे नाशवंत उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्यांमार्फत शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या फळे व भाजीपाला याबाबत माहिती संकलित केली असून  सदरील माहिती व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था आज गरजवंतांना मदत करीत आहेत, या सामाजिक संस्थांनी जर शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी केल्यास शेतकर्यांचा होणारा नुकसान टाळुन शेतकरी सुखावला जाईल. 

-- सुनील जाधव 
(तालुका कृषी अधिकारी, उमरगा )

1 Comments

  1. होय यामुळे शेतकरियचा फायदा होईल,

    ReplyDelete
Previous Post Next Post