तासगांव शहराला कचरा मुक्त शहर म्हणून 3 स्टार नामांकन शहर स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व आभार - मुख्याधिकारी गणेश शिंदे


(राहुल कांबळे तासगाव)
                   तासगांव नगरपरिषदेने स्वच्छतेत सातत्य ठेवत शहर स्वच्छतेमध्ये देशात अग्रेसर स्थान मिळवले आहे. काल केंद्रशासनाने कचरा मुक्त शहर म्हणून तासगांव शहरास 3 स्टार नामांकन बहाल केले. हे यश आपल्या सर्वांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे लाभले आहे. शहरासाठी अहोरात्र झटणार्‍या पालिका कर्मचारी, पदाधिकारी, आणि सर्वात महत्त्वाचे सर्व तासगांवकर नागरिक, संस्था, मंडळे, शाळा व पत्रकार आदी. आपल्या सर्वांचे या लोकचळवळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या योगदानामुळे शहराला देशपातळीवर अभिमानास्पद यश प्राप्त झाले आहे.
                    स्टार रेटींग आणि शहर स्वच्छतेसाठी तासगांव नगरपरिषद चे सर्व पदाधिकारी, मान्यवर, कर्मचारी, सर्व विभाग, सफाई कर्मचारी, पत्रकार, शाळा, कॉलेज, शिक्षक, विद्यार्थी, सर्व संस्था, असोशिएशन, तरुण मंडळे, संघटना, महिला बचत गट, आणि सन्माननीय सर्व तासगांव शहर व उपनगरातील नागरिक, स्वच्छतादूत, स्वच्छ शहर अंमलबजावणी कक्ष आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन..!
                  या निमित्ताने स्वच्छता हीच सेवा हा जीवनाचा संस्कार ठरवून योगदान दिलेल्या  प्रत्येक तासगांवकर नागरिकाचे अभिनंदन व आभार....!



मा.गणेश शिंदे
(मुख्याधिकारी तासगांव नगरपरिषद, तासगाव)

Post a Comment

Previous Post Next Post