सरणवाडी कोरोना ग्रस्ताच्या संपर्कातील 6 जणांचे रिपोर्ट निगेटिव्हपरंडा - परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील युवकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले होते. आरोग्य विभागाने तातडीने बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी घेऊन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे  पाठवले होते आज त्यांचा अहवाल आला आहे. त्या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बधिताच्या कुटुंबातील व्यक्ती, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करणारे डॉक्टर, खाजगी दवाखान्यात त्याच्या शेजारील व्यक्तीचे अहवाल घेण्यात आले होते. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कातील आणखी 23जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंडा तालुक्यातील आसू ,पिंपळवाडी, पाचपिंपला  यागावतील त्या बाधित व्यक्ती ने फळे, भाजीपाला खरेदी केला असल्याने प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे तसेच सोलापूर जिल्यातील करमाळा अनेक तालुक्यातील गावात हा रुग्ण फिरलेला असल्याने त्याचा तपास सुरू आहे  तर कोरंटाईन केलेल्या 23 जणांवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे.

Post a Comment

Previous Post Next Post