परंडेकरांना मोठा दिलासा परंडा तालुक्यातील त्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी 8 जणांचे अहवाल नकारात्मक-डॉ सय्यदपरंडा :-ग्रीन झोन असलेल्या उस्मानाबाद जिल्यात  सोमवार दि 11 रोजी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता त्या रुग्णाच्या संपर्कात तालुक्यातील 22 जण आले होते त्यातील 6 जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने तालुकवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे तर त्यातील आणखी 8 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून  ते सर्व अहवाल नकारात्मक आले आहेत अशी माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद यांनी   दैनिक जनमत शी बोलताना दिली
डॉ सय्यद म्हणाले की  रुग्णाच्या संपर्कातील 22 जनांपैकी 6 जणांचे अहवाल काल दि 12 रोजी प्राप्त झाले ते सर्व अहवाल नकारात्मक आले होते तर आज 8जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत तेही नकारात्मक आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे
 पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानुसार 5 - 5 दिवसानंतर स्वाब पाठवावे लागतात त्यानुसार उर्वरित जणांचे ठराविक वेळेत पाठवले जाणार आहेत अशी  माहिती डॉ सय्यद यांनी दिली
   जिल्ह्यात पझिटिव्ह  रुग्ण  सापडल्याने  गालबोट लागल्याने लाल परी ,विविध आस्थापना बंद कराव्या लागल्या असल्या तरी अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post