शोकाकुल वातावरणात पुळुज येथे शहीद धनाजी होनमाने यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


 
 
मगरवाडी / प्रतिनिधी

 पुळुज(ता.पंढरपूर)येथील भूमीपुत्र व पोलिस उप निरीक्षक धनाजी तानाजी होनमाने (वय२९)हे रविवार दिनांक १७ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पोयरकोटी-कोरपर्शी जंगलात नक्षलवादी यांच्या बरोबर झालेल्या चकमकीत शहीद झाले.शहीद धनाजी होनमाने यांच्या पुळूज या जन्मगावी सोमवार (दि १८)रोजी उपस्थित राहून राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री व सोलापूर चे पालक मंत्री मा ना दत्तात्रय भरणे व  यशवंत माने व तसेच पंढरपूर चे आ.भारत(नाना)भालके यांनी शहीद धनाजी होनमाने यांच्या पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करून दर्शन घेतले.धनाजी यांना जि.प्र शाळेच्या पटांगणात अग्नी देण्यात आली  या वेळी उपस्थितीनी आई,वडील व भाऊ यांच्याबरोबरच कुंटुंबाचे सांत्वन केले.व यावेळी शहीद धनाजी होनमाने यांच्या कुंटुंबीयास १ कोटी,३८ लाख आर्थिक मदत,आई वडीलांना पेंशन व कुंटुंबातील एक जणास शासकीय सेवेत समावेश घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आ.यशवंत माने,आ.भारत भालके यांनी जाहीर केले.यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,सोलापूर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके  ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,प्रातधिकारी  सचिन ढोले,तहसीलदार वैशाली वाघमारे ,उप विभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सागर कवडे पोलिस निरीक्षक किरण अवचर, उमेश परिचारक,  सतिश जगताप, राजाराम बाबर अनेकांनी पुष्पहार अर्पण केले.  यावेळी इतर मान्यवर, अधिकारी वर्ग व ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post