दैनिक जनमत : जत नागरपरिषदेला उशिरा सुचलेले शहाणपण ; कोरोना संदर्भात दोन महिन्यानंतर लावली मीटिंग

Sunday, May 17, 2020

जत नागरपरिषदेला उशिरा सुचलेले शहाणपण ; कोरोना संदर्भात दोन महिन्यानंतर लावली मीटिंगजत /प्रतिनिधी:
कोरोना महामारी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जत नगरपरिषदेच्या वतीने आज ४ वाजता जी मीटिंग बोलावली आहे हे जत नागरपरिषदेला उशिरा सुचलेले शहाणपण आहे असा गंभीर आरोप जत नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेता विजय ताड यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील अशी एकमेव नगरपरिषद असेल की जी विरोधी पक्षनेता आणि नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन काम करत आहे. कोरोना महामारी मध्ये सध्या जगात यावर शासन गंभीर होऊन महाराष्ट्रासह देश लॉकडाउन चा सामना करत आहे पण जतची नगरपरिषदचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा हुकूमशाही पद्धतीने भोंगळ कारभार करीत आहे.
लॉकडाउन २२ मार्च पासून चालू झाले आहे तेंव्हा पासून कोणत्याही नगरसेवकाला नगरपरिषदच्या वतीने कोणकोणत्या उपाय योजना करत आहे याबाबत कधीही मिटिंग न घेता मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी मिळून जत मधील जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा उद्योग चालू केला आहे
नगरपरिषदेच्या वतीने केलेली औषध फवारणी ही केवळ दिखावा करून जनतेचे दिशाभूल करत या औषधाने साधे जंतू सुद्धा मेला नाही यामधून केवळ लाखोंची मलई खाण्याचा उदयोग सत्ताधारी मंडळी करीत असल्याचा आरोप ही ताड यांनी केला.जत नगरपरिषदेने कोरोना संदर्भात आज ४ वाजता जी घेतलेली बैठक हा केवळ दिखावा असल्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही आज या बैठकीवर बहिष्कार टाकत आहे अशी माहिती विरोधी पक्षनेता विजय ताड यांनी ही दैनिक जनमत शी बोलताना दिली .