वागदरी (किशोर धुमाळ)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पुकारलेल्या लाॅकडाऊन व संचार बंदी यामुळेच आर्थिक आडचणीत सापडलेले निलेगाव ता.तुळजापूर येथील मुळ रहीवासीअसलेले पती पत्नी सिंहगड धायरी वडगाव पुणे येथून मोटारसायकली वरुन गावाकडे येत असताना वाटेतच अपघात होऊन मृत्यु पावल्याची दुर्दैवी दुःखद घटना घडली आहे.
या बाबत माहिती असी की,निलेगाव ता.तुळजापूर येथील दयानंद कुंडलीक दुपारगुडे हे आपली पत्नी, दोन मुले सुन व नातवंडे आदी सह सिंहगड धायरी वडगाव पुणे येथे राहत होते. ते आपल्या मुलांच्या न्यूजपेपर विक्री व्यवसायात मदत करत होते तर पत्नी सुवर्णा दयानंद दुपारगुडे ही धुणीभांडी करून आपल्या कुटुंबाला मदतीचा हातभार लावत होती .परंतु गेल्या दोन महीन्यापासुन कोरोना मुळे देशभरात लाॅकडाऊन व संचार बंदी लागु झाल्याने त्यांचे सर्व व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक आडचणीतमुळे उपासमारीची वेळ आल्याने त्यानी गावाकडे जाण्यासाठी दि.१७ मे २०२० रोजी मोटारसायकलीने सकाळी ७.०० सुमारास पुणे येथून निघाले असता अर्ध्या वाटेत इंदापूर जवळ सकाळी ११.३०वा.दरम्यान पाणी पिण्यासाठी रोडच्या कडेला थांबले असता पुणे कडून पाठीमागुन येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने सुवर्णा दयानंद दुपारगुडे वय ४५ ह्या जागीच ठार झाल्या तर दयानंद कुंडलीक दुपारगुडे वय ५२ वर्ष हे दवाखान्याकडे उपचारासाठी घेवुन जात असताना मृत पावले व त्यांच्या जवळ असलेली लहान मुलगी जखमी झाली. सदर घटणेची नोंद इंदापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असुन रात्री १०.३० वा.दरम्यान निलेगाव येथे म्रत्य पतीपत्नीच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात आला.
त्यांच्या पश्चात वडील, दोन मुले, सुन व नावंडे असा परिवार आहे.
कोरोना विषाणूने व उपासमारीने जीव वाचविण्यासाठी गावाकडे निघालेल्या पती पत्नीवर अर्ध्या वाटेतच काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शासनाने मृत पावलेल्या पती-पत्नीच्या वारसाना आर्थिक मदत करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
No comments:
Post a Comment