बँक म्हणते सोनतारण ठेवून कर्ज घ्या ! किसान क्रेडिट कार्डची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला बँकेचा अजब सल्लाइटकळ ( प्रतिनीधी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजनेला हरताळ फासण्याच काम बँका करीत असल्याचे दिसून येत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजेनेला अनुसरून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यासाठी नवी योजना आणली आहे. मात्र संबधित बँकेकडून शेतकऱ्यांना याचा लाभ न देता हरताळ फासत उडवा उडवी चे उत्तरे दिली जात आहेत.त्यामुळे बँकेत जाऊन शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येत आहे. मौजे शिरगापुर येथील शेतकरी विनायक जाधव यांनी या योजनेचा लाभ घेण्या साठी मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभार्थी असल्याने त्यांचे मानधन तुळजापूर येथील कॅनरा बँक शाखा येथे जमा होत असल्याने त्यानुसार शेतकरी विनायक जाधव यांनी बँकेला किसान क्रेडिट कार्डची ऑन लाईन मागणी केली. बँकेचा किसान क्रेडिट कार्ड साठी संपर्क साधावा म्हणून एसएमएस आल्याने ते बँकेत जाऊन त्याची चौकशी केली असता.बॅंकेने ते देण्यास नकार दिला. किसान सन्मान योजनेचा मानधन ज्या बँकेत जमा होते. त्या बँकेकडे क्रेडिट कार्ड मागणी करणे आवश्यक असताना ही  विनायक जाधव यांनी आशिष कुमार भूतान जॉइंट जनरल सेक्रेटरी भारत सरकार यांचे ६ फेब्रुवारी २०२० चे सर्क्युलर ची प्रत देऊन त्या नुसार तुम्ही मला या योजने चा लाभ द्यावा असे लेखी स्वरूपात मागणी केली. बँकेने त्यांना तुमचे गाव आमच्या क्षेत्रात येत नाही तसेच आपण कृषी सोने तारण कर्ज घेऊ शकता असे बँक शाखाधिकारी यांनी लेखी स्वरूपात दिले.आणि तुम्ही उगीच लेखी माहिती घेऊ नका तुमची चौकशी होऊन तुमच्यावर कारवाई होईल असे सांगितले.केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही.जर कोणी बँकेकडे लेखी स्वरूपात माहिती मागितली तर मराठी भाषा अनिवार्य असतांना ही शेतकऱ्याना इंग्लिश मध्ये माहिती दिली जाते ती माहिती शेतकरी तरी वाचणार कस आणि माहिती मराठीतुन द्यावी म्हणून शेतकऱ्यानी बँकेकडे अर्ज केला तर बँक शाखाधिकारी एक महिन्याने मराठीत माहिती देऊ असे सांगतात. या अशा बँकेच्या मनमानी कारभारमुळे शासनाच्या शेतकऱ्यासाठी योजलेल्या योजेनेला हरताळ फासले जात असुन अगोदरच शेतकरी सतत येणाऱ्या संकटाने मोडकळीस आला आहे. तो उध्वस्त होताना दिसत आहे. यासाठी सर्व पक्षीय लोक प्रतिनधींनीही अधिक लक्ष घालावे अशी मागणी विनायक जाधव यांनी केली आहे. तसेच या संबंधी  विनायक जाधव यांनी निवेदाद्वारे जिल्हाधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून  बँकेला शासनाच्या योजनेची अंमबजावणीसाठी  प्रवृत्त करावे.अशी मागणी शेतकरी विनायक जाधव यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment