दशहरा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात द्राक्षांची आकर्षक आरास


पंढरपूर (प्रतिनिधी):-
अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आद्यपीठ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात आज दशहरा दिनाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा येथे सुंदर आकर्षक अशा द्राक्षांची  विलोभनीय अशी सजावट करण्यात आली आहे. *"तें तीर्थांचें माहेर। सर्व सुखाचें भांडार।।"*
या संत ओवि प्रमाणे सर्व सुखाचे भांडार ज्याच्या चरणी आहे त्या विठ्ठलाचे दर्शन सध्या कोरोना व लाॅकडाऊन मुळे होत नसल्याने व मंदिर बंद असल्याने भाविकांसाठी मंदिर समितीने द्राक्षाची केलेली आरास सादर केली आहे.  या द्राक्षांची सजावट पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील कृष्णा देशमुख यांच्या वतीने अर्पण  करण्यात आली असून या सजावटीमध्ये द्राक्षांचे घड व द्राक्षवेली चा उपयोग केला असल्याने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे.  ही सजावट मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

No comments:

Post a Comment