दैनिक जनमत : तासगाव तालुक्यातील वासुंबे गावातील गारपिटीमुळे झालेल्या द्राक्ष बागेची ना. जयंतराव पाटील यांची पाहणी

Monday, May 25, 2020

तासगाव तालुक्यातील वासुंबे गावातील गारपिटीमुळे झालेल्या द्राक्ष बागेची ना. जयंतराव पाटील यांची पाहणी  • आमदार श्रीमती सुमनताई पाटील व जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील यांची प्रमुख उपस्थिती


  • दुर्घटना झालेला कुटुंबास शासनाच्यावतीने मदतीचा धनादेश सुपूर्द

तासगाव प्रतिनिधी दि.
रविवार दिनांक २५ रोजी तासगाव तालुक्यातील वासुंबे, मतकुणकी येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कथा जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील साहेब व आ.सुमनताई पाटील यांनी प्रचंड गारपिटीने झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या दोन्ही गावासह तासगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.महाविकास आघाडी सरकार कायम बळीराज्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,अशी प्रतिक्रिया शेतकऱ्याच्या बांधावर पोहचल्यानंतर सदरच्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकल्या नंतर ना.जयंत पाटील  यांनी व्यक्त केली आहे.
तसेच,वासुंबे मतकूणकीत वादळी वाऱ्याने संजय शिरतोडेंच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले होते. या दुर्घटनेत त्यांच्या ५ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. सदरच्या दुःखद कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मदतीचा धनादेश तासगाव कवठेमंकाळ च्या लोकप्रिय आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तासगाव च्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी श्रीमती दीपा बापट,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमोल शिंदे, माजी पंचायत समिती सभापती एडके, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब एडके, राष्ट्रवादीचे नेते ना. जयंतराव पाटील यांच्या कट्टर समर्थक युवा नेते खंडू पवार,तासगावचे मंडल अधिकारी प्रवीण माळवे, तालुका कृषी अधिकारी,तलाठी पतंगअण्णा माने, मतकुणकी च्या तलाठी कल्पना लोणकर, वासुंबे गावातील ग्रामपंचायतचे सदस्य माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक व ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे व वादळामुळे द्राक्ष शेतीचे प्रचंड नुकसान झाले असे सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी अक्षरशः आपली व्यथा मांडत असताना स्वतःला हुंदका आवरता आला नाही अक्षरशा सदरचे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी अविनाश काका पाटील, आमदार सुमन ताई पाटील यांनी सदरच्या शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तर ना जयंतराव पाटील यांनी निश्चितपणे आमचे सरकार नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहील मी स्वतः लक्ष घालून मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना संपूर्ण माहिती देऊन तातडीने काय करतायेत येते का.. हे पाहून घेतो.. त्यामुळे वासुंबे मतकुणकी,व तासगाव तालुक्यातील नुकसान झालेल्या द्राक्ष बागातदार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

  उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत.  महात्मा गांधी रोजगार हमी...