हुश्श... चिखली येथील पोलिसाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह


उस्मानाबाद - तालुक्यातील चिखली येथील  पोलिसाच्या संपर्कातील व्यक्तींचे कोरोना चाचणीचे  अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर एक रिपोर्ट अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आहे. मात्र तूर्तास उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला आहे. दि  २ मे रोजी सोलापूर येथे पोलीस सेवेत असलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पाॅझीटीव्ह आल्याची बामती आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने चिखली हे गाव सिल करून संबंधित व्यक्तीच्या घरातील व्यक्तींना दवाखान्यात दाखल करून त्यांची चाचणी केली होती. त्याचा अहवाल आज निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. तसेच आज एकूण वीस जणांचे अहवाल आले आहेत सर्व अहवाल निगेटीव्ह असल्याने जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. 

No comments:

Post a Comment