सलग दुसऱ्या दिवशीही मायणी पोलीसांची मोठी कारवाई साडेसहा लाख रु चा मुद्देमाल जप्त



मायणी प्रतिनिधी-
 सलग दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई असून उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी वडूज चे पी आय पाटील यांनी मायणी पोलास टीमचे अभिनंदन केले .
  मिळालेल्या माहितीनुसार विखळे फाटा येथे एका इनोव्हा गाडीवर कार्यवाही केली गाडीत विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले . मायणी दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांना माहिती मिळाली की एका गाडीतून दारूची विना परवाना वाहतूक होणार आहे या माहितीच्या आधारे गोसावी यांनी विखळे फाटा येथे सापळा रचला आसता पडळ  बाजूने एक इनोव्हा गाडी क्र एम एच ०४क क १०५३ वेगाने कलेढोंन बाजूला जाताना दिसली सदर गाडी थांबवून गाडी तपासले असता गाडीत विदेशी दारुचे बॉक्स आढळुन आले  त्याची किंमत ५७६०० रु त्यांच्याकडे चौकशी केली आसता त्यांच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता .विनापरवाना विदेशी दारू वाहतूक करीत असलेल्या दोघाजणांवर गुन्हा दाखल  केला आहे. इनोव्हा गाडीसह असलेल्या मुद्देमालची किंमत अंदाजे साडे सहा लाख रु आहे .
    याच्य आगोदर म्हणजे एक दिवस अगोदर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेंपोवर कारवाही केली होती सलग दोन दिवसात दोन मोठया कारवाई मुळे मायणी पोलिस व आधिकरी यांचे कौतुक होत आहे.या कारवाईत
उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मायणीचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी  व  , पो ना खांडेकर,पो कॉ सानप,पो कॉ कोळी, पो कॉ सूर्यवंशी यांनी भाग घेतला
     
    

No comments:

Post a Comment