उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ३ कोरोना पाॅझिटीव्हउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ३ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. यात कळंब तालुक्यातील २ आणि भूम तालुक्यातील एकाचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यासाठी हि धोक्याची घंटा आहे. यापूर्वी एकूण सात रुग्ण आढळून आले होते त्यातील ३ जण यातून मुक्त झाले होते. गेल्या आठवड्यात परंडा तालुक्यात एक आणि कळंब तालुक्यात तिघे आढळून आले होते. आज कळंब तालुक्यातील दोघे जण बाधित आढळून आल्याने कळंब तालुका हॉटस्पॉट बनला आहे. ३ पैकी दोन महिला आहेत तर एक पुरुष आहे. दोन महिलांचे सासरे मुंबई येथे कोरोनाने दगावले होते. तर भूम येथील व्यक्ती मुंबई येथे दवाखान्यात काम करत होता. 

No comments:

Post a Comment