व्यवस्थापनशास्त्र विभागाची 'लॉकडाऊन' मधील आयडिया - 'डिजिटल अकॅडमिक प्लॅटफॉर्म'ची निर्मिती - उपपरिसर व्यवस्थापनशास्त्र विभागाचा उपक्रम


उस्मानाबाद, दि.१४ः  लॉकडाउनमुळे शिक्षणक्षेत्रासह बहुंताशी क्षेत्रातील कामे थांबली आहेत. परंतु याही परिस्थितीत उपलब्ध पर्यायामध्ये तंत्रज्ञांनाच्या सहाय्याने व्यवस्थापनशास्त्र विभागाने उत्तर शोधले आहे

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
उप-परिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाने विभागाच्या विद्यार्थ्यासाठी “डिजिटल अकॅडमिक प्लॅटफॉर्म” ची सुविधा तयार केली आहे. हा प्लॅटफॉर्म वेबसाइट व मोबाईल अप्लीकेशनद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सेवा विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध असून सदर सुविधा ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांना विभागामार्फत आय डी व पासवर्ड मिळतील. या प्लॅटफॉर्म वरती विविध कोर्स नुसार प्रत्येक सेमेस्टरचे एक टॅब तयार केले आहे. ज्या सेमिस्टर मध्ये विद्यार्थी आहे त्याने त्या टॅब मध्ये प्रवेश केल्यास त्याला विषय निवडायचा आहे त्या विषयाच्या टॅब वरती त्याला संबधित विषयाचे विविध प्रकारातील ऑडिओ,व्हिडिओ, पी. डी. एफ., पी. पी. टी.,विषयाची पुस्तके, नोटस, बातम्या, ब्लॉग लिंक, संशोधन लिखाण, प्रश्नावलि, मॅनेजमेंट गेम्स, बिजीनेस प्लॅन, केस स्टडी आदी अभ्यास करण्यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध केले जाणार आहे. सदरील साहित्य हे त्या विषयाच्या शिक्षका मार्फत त्या प्लॅटफॉर्म वरती पुरवलेले असेल. त्यामुळे घरी राहून देखील सर्व टिचिंग व लर्निंग चालू रहण्यास मदत होणार आहे, तसेच वेळोवेळी विभागामार्फत दिली जाणारी नोटिस,आसाईन्मेंट, प्रोजेक्ट, कार्यक्रम, माहिती देखील विद्यार्थ्यांना सदर प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध असणार आहे. त्याच बरोबर विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचे माहिती संकलन तिथे उपलब्ध होणार आहे. जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या सोबत देखील संवाद ठेऊन प्रोजेक्ट, फील्ड सर्वे, नौकरी व मार्गदर्शन बाबत माजी विद्यार्थ्याद्वारे मदत घेऊ शकेल. 'प्लेसमेंट ' या टॅब मध्ये उपलब्ध झालेल्या प्लेसमेंट बाबत बातम्या, जाहिरात, संपर्क देखिल विद्यार्थ्यांना त्यावरती उपलब्ध होणार आहेत. विभागातील होणारे कार्यक्रम बाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे. विभागाचा आद्याप पर्यंतचा प्रवास, माहिती, विभागाच्या उपलब्धता, शिक्षक, सेवा व सुविधा, कार्यक्रम फोटो बाबत माहिती या उपक्रमा मार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बाबत व विषया बाबत काही आडचण असल्यास तो या प्लॅटफॉर्म वरुण समंधित शिक्षकास ईमेल पाठऊ शकतो सदरील ईमेल चे उत्तर विद्यार्थ्याला ईमेल वरती मिळू शकले. जिथे आवश्यकता असेल तिथे संपर्कासाठी गुगल फॉर्म व गुगल मिट यांचाही वापर केला जाणार आहे.
या प्रकल्पासाठी मोलाचे मार्गदर्शन कुलगुरू. डॉ. प्रमोद येवले यांचे लाभले आहे. तसेच प्र कुलगुरू  डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव  डॉ.  जयश्री सूर्यवंशी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे आधीष्ठाता प् डॉ. वाल्मीक सरवदे,  व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. अभिजीत शेळके, उप-परिसराचे संचालक डॉ. प्रशांत दीक्षित यांचे मार्गदर्शन मिळाले. या प्रकल्पाचे नियोजन विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी केले या प्रकल्पातील शैक्षणिक जबाबदारी डॉ. विक्रम शिंदे,विभागाच्या माहितीची  प्रा. सचिन बस्सैये व प्लेसमेंट व माजी विद्यार्थी बाबत जबाबदारी प्रा. वरुण कळसे यांनी पूर्ण केली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रा. शीतलनाथ एखंडे व विभागाचा विद्यार्थी सूरज शिंदे यांनी महत्वाचे तांत्रिक सहकार्य केले आहे. विभागातील विद्यार्थ्यांची नोंदणी व माहिती आपलोड चालू केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post