दैनिक जनमत : सी एस सी केंद्रचालकांवर उपासमारीची वेळ;आर्थिक मदत देण्याची मागणी

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Friday, May 15, 2020

सी एस सी केंद्रचालकांवर उपासमारीची वेळ;आर्थिक मदत देण्याची मागणी



खानापूर(बालाजी गायकवाड)कोरोनाच्या संकटाने सी एस सी केंद्र बंद असल्याने केंद्रचालकांवर उपसमारीची वेळ आली आहे.त्यांना जगणे मुश्किलीचे झाले आहे. आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
  सी एस सी केंद्रचालक शासनाचे सर्व प्रकारचे उपक्रम,विविध सेवा ,शेतकऱ्याचे विविध योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करतात.शेतकऱ्यांचा विमा भरणे,आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवणे,किसन क्रेडीड कार्ड अश्या केंद्रासरकरच्या व राज्यसरकारच्या  अनेक योजना लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे 23 मार्च पासून केंद्र बंद अवस्थेत आहेत.केंद्र बंद असल्याने त्यांच्यावर उत्पन्नचा स्रोत बंद झाला आहे.केंद्राचालक हे सुशिक्षित बेरोजगार आहेत.ते या सी एस सी केंद्राच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह भागवत होते परंतु कोरोनाच्या महामारीने केंद्र बंद झाली आहेत.या केंद्रावर वर अवलंबून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न होता परंतु केंद्र बंद झाल्याने त्यांची परिस्थिती अवघड झाली आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . अनेक केंद्राचालकांचे केंद्र हे खाजगी मालकीच्या जागेत असल्याने त्यांना  जागेचे भाडे भरणे सुद्धा त्यांना कठीण झाले आहे.
    तरी शासनाने याची दखल घेत केंद्राचालकांना मदत करावी,आमच्यावर आलेली उपासमारीची वेळ आणखीन सुगम्य न होऊ देता आम्हाला मदत करावी. अशी मागणी उस्मानाबादचे जिल्हाधिकरी दिपा-मुधोळ मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आम्ही आजपर्यंत शासनाच्या अनेक योजना उपक्रम राबण्यासाठी कार्य केले यापुढील काळात शासनाचे मोठ्या उमेदीने उपक्रम योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहुन शासनाला सहकार्य करू  आम्हला आर्थिक मदत करावी असे मत उस्मानाबाद व्हीएलइ संघटनेचे अध्यक्ष अमितकुमार सोनवणे यांनी व्यक्त केले.