पत्नीच्या बदनामीचा राग मनात धरून सरकोली येथे डोक्यात दगड घालून युवकाचा खून घटनेतील आरोपी अटकेतपंढरपूर(प्रतिनिधी):-   पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावांत आपल्या पत्नीची बदनामी केल्याचा राग मनात धरून गावातीलच आरोपी विनोद लक्ष्‍मण भोसले यांने संतोष सुरेश कापणे हा झोपलेला असताना त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून केला खूनाच्या या प्रकाराने सरकोली परिसरात एकच  खळबळ उडाली.
22 मे च्यारात्री पावणेअकराच्या सुमारास सदर घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व  तपासाची चक्रे फिरवली
 या घटनेची पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी आरोपी विनोद लक्ष्मण भोसले राहणार सरकोली याने एक वर्षापूर्वी संतोष सुरेश कापणे (वय 32) राहणार सरकोली याचे विरोधात आपल्या पत्नीची बदनामी केली म्हणून मनात राग धरून होता एक वर्षापासून तो मयत संतोष यास बदनामीचा  जाब विचारत असे परंतु संतोष त्याला कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याच्या मनात बदला घेण्याची वृत्ती निर्माण झाली व त्याने घरासमोर झोपलेल्या संतोष सुरेश कापणे याच्या डोक्यात मोठा दगड घालून खून  केला.
 संतोष याचा दूधाचा  व्यवसाय असून पहाटे त्याला झोपेतून उठवण्यासाठी आई त्याच्याकडे गेली असता हा प्रकार उघडकीस आला.
सदर घटनेची माहिती गावांमध्ये पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी बदनामी व पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली  असून यातील आरोपी विनोद लक्ष्मण भोसले यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यास तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

                               मयत

No comments:

Post a Comment