दैनिक जनमत : रमजानच्या पार्श्‍वभूमीवर पंढरीत रविवारचा जनता कर्फ्यू रद्द- नगराध्यक्षा भोसले

Saturday, May 23, 2020

रमजानच्या पार्श्‍वभूमीवर पंढरीत रविवारचा जनता कर्फ्यू रद्द- नगराध्यक्षा भोसलेपंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरांमध्ये मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने रविवारी असणारा जनता कर्फ्यू हा रद्द करण्यात आल्याची माहिती पंढरपूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.  साधनाताई भोसले यांनी दिली. कोरोनाच्या  पार्श्‍वभूमीवर शहरात सोमवार ते शनिवार  सकाळी नऊ ते पाच या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांनी आपली अस्थापना दुकाने उघडी ठेवावीत त्याचबरोबर रविवारी शहरात जनता कर्फ्यूचे पालन करण्यात यावे असे असताना मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सनानिमित्त त्यांना लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठ उघडे ठेवण्यात येणार असून रविवारचा जनता कर्फ्यू रद्द केला आहे. पुढील रविवारी आजचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष भोसले यांनी दिली. दरम्यान  पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पाण्याची पातळी कमी झाली  असून शहरावर पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.  पाण्याच्या नियोजनासाठी शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रविवारपासून घेण्यात आला होता परंतु रमजान सणाच्या निमित्ताने हा निर्णय ही दोन दिवस पुढे घेत एक दिवसाआड पाणीपुरवठा हा दोन दिवसानंतर सुरू केला जाईल व सणानिमित्ताने शहरवासीयांना दररोज दोन दिवस पाणी नेहमी प्रमाणेच येणार असल्याची माहितीही यावेळी नगराध्यक्षा यांनी दिली दरम्यान नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.