दैनिक जनमत : कोरोनाने जिल्हाभर पसरले पाय प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा रुग्ण

Thursday, May 21, 2020

कोरोनाने जिल्हाभर पसरले पाय प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा रुग्ण



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना चा संसर्ग वाढत चालला आहे.  गुरुवारी मध्यरात्री सहा जणांचे अहवाल होकारात्मक आले आहेत. त्यात परंडा १, वाशी१, लोहारा तालुक्यातील जेवळी ४ असे नविन रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी सकाळी शिराढोण  येथील एक महिला आढळून आली होती मात्र ती महिला लातूर येथे उपचार घेत आहे. तर उमरगा येथे दुपारी एका महिलेचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा रुग्ण असल्याने धोका वाढत चालला आहे. 

'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

  उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत.  महात्मा गांधी रोजगार हमी...