उमरगा - शहरात एक रुग्ण पाॅझिटीव्ह आढळून आला आहे. तो रुग्ण पुणे येथून आला असून त्याच्यावर सध्या उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. हा रुग्ण उमरगा शहरातील एस. टी. कॉलनी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यात पहिला रूग्ण उमरगा तालुक्यात आढळून आला होता त्यानंतर आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेतली होती. त्याच्यासह इतर दोघांवर उपचार करून त्यांना कोरोना मुक्त केले होते. मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात मुंबई पुणे या ठिकाणावरून येणाऱ्यांची संख्या वाढली त्यातील काही जण कोरोनाबधीत आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे.
Tags
उस्मानाबाद