डॉक्टर साहेब तुम्ही शत:आयुषि व्हा


                        प्रिय , डॉ. पद्मसिंह पाटील  साहेब !         आपल्याला 80 व्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !        लहानपणी कळायला लागल्यापासून आमचा तुम्हाला लळा लागला, तूमच्या राजकारणातली भरभराट अनं आमचे बालपण एकाच वेळी फुलत गेलं,  माझ्या वडिलांचे आजोळ म्हंजे माझं पंजोळ तेर असल्यामुळे असेल कदचित , ऊठसूट तेरला येण्या मूळ आपलं मोठेपण आमच्या लहानपणीच दुरून ऐकून,  पाहिलं  !     
           उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर सारख्या गावातील तरुण पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेतो डॉक्टर  होतो तसच राजकारणात पण सक्रिय होतो. अनं बघता बघता   जिल्हा परिषद  पासून आमदार , खासदार ते पाटबंधारे , ऊर्जा मंत्री पासून ग्रूहमंत्री होतो हा प्रवास आपला साधा सुधा नव्हता. मराठवाड्यातील उस्मानाबाद सारख्या मागासलेल्या जिल्ह्यास विकासाच्या मार्गावर आणणे येवढं सोपं नव्हतं. जे आपन तेही करून दाखवल. तेही त्या काळात जेव्हा लाईट , टेलिफोन किंबहुना दळणवळणाची कोणतीही साधन नसतानाचा तो काळ , माझं गांव तसं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असल्यामुळे आम्ही नंदनवनातच होतो ,  पण आपल्या नेतृत्वाची भुरळ काही गावांना बसली अनं बार्शी तालुक्यातील आठ गांव उस्मानाबाद जिल्हयात सामील झाली अनं ही येड्शि तडवळा अशी गांव आपल्या मतदारसंघात सामील झाली,  आणि आपल्या कार्यकाळात  नवं उमेदीच्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवसच आले जणू , चौथी , पाचवी ' अनं आठवी नापास गावागावात सरपंच , सभापती , अनं सोसायटीच्या बँक कारखान्यावर संचालक म्हणून बिनदिक्कतपणे दिमाखात बसू लागले , म्हशी राखणारे कारखान्यानें चालवायला लागले , व गावागावात जुगार खेळणारे बॅंकां चालवायला लागले , दुसऱ्याच्या भाकरी खाऊन जगणारे सहकार क्षेत्रात भीष्म पिता होऊन करोडोची माया जमऊ लागले , आपन मुंबईत  रहा आम्ही मतदारसंघ जिल्ह्यासह हँडल करतो !  असं म्हणनारे गावो गांवचे नातलग, फक्त निवडनूकी पुरते तुम्हाला जवळ करणारे , व निधी गिळून बसणारे बोके गूर्र गूर्र करत असायचे ,  आपल्या कारकिर्दीतील काळात आपन जिल्हयात जे जे हवं ते ते सगळं मिळऊन दिलं , विमानतळ पासून  दिल्लीच्या तक्तावर मांड ठेऊन रेल्वेला उस्मानाबाद मधे यायला भाग पाडले !          यात आपला काहीच दोष नाही ,आपली दानतच इतकी मोठी होती आपन हात झटकला तरी लोकांनी बंगले बांधले , अनं ज्यांना तुम्ही सगळं दिलेलं त्यांनी सगळं विस्कटून टाकायच काम तेवढं  तूमच्या वळचनींच पाणी पिणार्या कावळयांनी केलं.       जे  सध्या लेनींन चे कपडे घालून बंगळे होऊन फिरायला लागले !  आपन आपुलकीने माणसं उभी केली त्यातली काही बेईमान , तर काही खुनशी, गद्दार ! निघाली तर कित्तेकजन आज ही तूमच्या सोबतीला राहिली. कठोर काळानें तुमचीं परीक्षाच घेतली पवार साहेबांनीची कारकीर्द तुमच्या छातीच्या  ढाली मूळ टिकली !  तुमचा मंत्रिमंडळातला वचक आज ही नवीन मंत्र्यांना शिकवला जातो.  छगन भुजबळ यांनी सेनेत केलेल बंड  तुमच्या संरक्षणामूळ टिकल , ज्या शिवसेनेत वाघ होते ते तुमच्यातला सिंह बघून मान टाकायचे ,  सभागृहात बोलताना भायखळा येतील जनता दलाचा आमदार तिखट काय बोलला , तर त्याला कुस्ती पहिलवानासारखा बाकावर उचलून आदळला , जो नारायण राणे साहेबांनी मध्यस्थीने केली म्हणून वाचला ! तुमच्यातला नीडर पणा  तुमच्या धडाकेबाज निर्णयामुळे मंत्रालयाचे अधिकारी घायाळ व्ह्ययचे यांचे किस्से आज ही मंत्रालयात अधिकारी सांगताना दिसतात !  तुमच्याकडे असलेला दबंग  पणा तुम्ही आज वयाच्या ऐंशी वर्षी पण जपलात , तुमच्याकडे असलेले कौशल्य  किती अदभुत होतं यांची किल्लारी भूकंपाच्या पुनर्वसन काळात व आत्ता आम्हाला याची जाणीव होते ,   तुमचा तो दरारा आज ही जिवंत राहो हीच इच्छा व आपणांस दीर्घ आयुष्य लाभो !                     

                       सोमनाथ तडवळकर

Post a Comment

Previous Post Next Post