राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टी होणार का आमदार ?


  • शरद पवारांच्या निवासस्थानी गोविंदबागेत शेट्टी यांची पवारांबरोबर चर्चा
बारामती प्रतिनिधी :
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी घेण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गोविंदबाग येथे सकारात्मक चर्चा केल्याचे समजते आहे.आता राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे या चार जागांपैकी एक जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवल्याचे समजते आहे.

यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्याचे ठरले होते त्यानुसार ही जागा सोडली जाणार असल्याचे तसेच सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आज राजू शेट्टी व शरद पवार यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे,
तसेच विधानसभेच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट असताना स्वाभिमानी संघटनेने मात्र महाआघाडीची साथ सोडली नाही व याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना विरोधी प्रचार व जनजागृती करत स्वाभिमानी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसची खंबीर साथ दिल्याचे दिसून आले आहे. 

या भेटीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच सतीश काकडे,स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चव्हाण व इतर नेते उपस्थित होते काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती परंतु त्यावेळी राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषद आमदार होणार की नाही याची खात्री झाली नव्हती मात्र आज झालेल्या चर्चेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राजू शेट्टी यांना विधान परिषदेची जागा सोडण्याचे निश्चित झाल्याचे समजते आहे.

Post a Comment

Previous Post Next Post