इटकळ ( दिनेश सलगरे ) राष्ट्रीय महामार्गावरील बाभळगांव पुला जवळील पडलेल्या खड्ड्यामुळे अज्ञात भरधाव वाहनाने ऑक्टिवा मोटार सायकला जोराची धडक दिल्याने दोन महिला शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात सोलापूर हैद्राबाद महामार्गावर बाभळगाव येथील तलावाच्या पुलावर सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडला. अधिक माहिती अशी की सोलापूर येथील या दोन महिला शिक्षिका वत्सला नगर आणदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होत्या शालेय व्यवस्थापन समितीची बैठक व विद्यार्थ्याना पुस्तके वाटपाच्या नियोजनासाठी या दोन शिक्षिका शशिकला नागेश कोळी वय 45 वर्ष व रोहिणी शंकर सपाटे वय 35 वर्ष दोन्ही रा.सोलापूर या स्कुटी मोटार साइकल ने सोलापूर हून आणदूर ला आल्या व शाळेतील काम झाल्या नंतर परत वत्सलानगर अणदूर येथील जिल्हा परिषद शाळेतून त्या सोलापूरला ऑक्टिवा मोटारसायकल एम एच 13 सीएच 9867 वर जात आसताना बाभळगाव ता.तुळजापूर येथील तलावाच्या पुलावर पाटीमागुन येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.हा अपघात इतका जोराचा होता की ऑक्टिवा मोटार साइकल जवळपास 300 फुट फरफट गेली.व अक्टिवा मोटार साइकल वरील दोन्ही शिक्षिका जागीच ठार झाल्या.अपघाताची माहिती मिळताच इटकळ औट पोस्ट चे सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृत देह पोस्ट मार्टेम साठी पाठवले.अपघात ग्रस्त वाहन पसार झाले.यामधील शशिकला कोळी यांच्या पति चाही मृत्यू गत वर्षी या ठिकाणच्या जवळच अपघातात मृत्यू झाला होता.या दोन्ही शांत व सुस्वभावी असलेल्या शिक्षिका अपघाती मरण पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.तरी या राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवून घ्यावेत अशी मागणी होत आहे