पंढरपूर शहराच्या प्रदक्षिणा मार्गावर कोरोनाचा सापडला पहिला रुग्ण


  • रुग्ण परिसरात घबराट, परिसर केले सील
  • आषाढी यात्रेच्या तोंडावरच रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून प्रशासन सतर्क झाले आहे.
  • ठाण्याहुन करकंब येथे आलेला एक जण सापडला पॉझिटीव्ह

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन नियोजनाच्या तयारीत असताना आज शहरातील स्थानिक व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचा अहवाल प्राप्त झाला त्याचबरोबर तालुक्यातील करकंब येथे एक रुग्ण पॉझिटिव आल्याचे समजतात प्रशासन सतर्क झाले आहे.

शहरातील बेलीचा महादेव परिसरात वास्तव्य असणाऱ्या एका  व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला आहे.तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. बेलीचा महादेव मंदिर परिसर सील करण्यात आले आहे.

ठाणे येथून करकंब मध्ये आलेल्या एका रुग्णास कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले असून या व्यक्तीला सध्या वाखरी येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल केले आहे.

कोरोनाचा चाचणीसाठी एकूण ४७ जणांचे स्वॅब घेतले होते.त्यापैकी आज ३९ अहवाल प्राप्त झाले असून २ अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत त्या पैकी एक व्यक्ती पंढरपूर स्थानिक तर एक  करकंब येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.तर ३६ अहवाल  नेगिटिव्ह आले आहेत.व १ निकृष्ट दर्जा आणि ८ अहवाल अजून प्रतेक्षित आहेत.

प्रदक्षिणा मार्गावरील हा भाग कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे. हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे.

 प्रशासनाने पॉझिटिव रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व थेट संपर्कातील लोकांच्या संपर्कात आलेले व्यक्तींचा शोध घेतला असता थेट संपर्कात ५१ जण मिळून आले तर इतर संपर्कातील ९४ असे मिळून १४५ जणांचा समावेश आहे या सर्वांना क्वाॅरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांनी दिली.

No comments:

Post a Comment