दैनिक जनमत : कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या निमित्ताने पवित्र चंद्रभागेच्या पाण्याने विठ्ठलाला अभिषेक

Sunday, June 21, 2020

कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या निमित्ताने पवित्र चंद्रभागेच्या पाण्याने विठ्ठलाला अभिषेक
  • वासुदेव हरी च्या जयघोषात केली विधिवत पूजा


पंढरपूर (दिनेश खंडेलवाल):-
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत व वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीस कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या निमित्ताने आज पवित्र चंद्रभागेचे पाण्याने स्नान घालण्यात आले.
"गंगा आली आम्हांवरी। संत पाऊलें साजिरीं।। तेथें करीन अंघोळी। उडे चरणरज धुळी। येती तीर्थावळी। पर्वकाळ सकळ।।पाप पळालें जळालें।भवदुःख दुरावलें।।"
या संत वचनाप्रमाणे पवित्र चंद्रभागा हे आम्हाला गंगेच्या समान असून पाप करणारे आहे अनेक संतांचे चरणस्पर्श झालेली अशा पवित्र चंद्रभागेच्या पवित्र स्नानाने आज ग्रहण पर्वकाळात विठ्ठलाला ग्रहण लागताना आणि ग्रहण सुटताना दोन्ही वेळेस चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने अभिषेक घालून  विधिवत पूजा अर्चा करून परंपरे प्रमाणे सर्व विधी करण्यात आल्या.
कंकणाकृती सूर्यग्रहण लागण्यापूर्वी व ग्रहण मोक्षा नंतर विठ्ठल मंदिरातील सर्व पुजाऱ्यांनी घागर कळशी तांबे आदी घेऊन पवित्र चंद्रभागेत स्नान करून चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने विठ्ठलाला विधिवत पूजाअर्चा करून त्यानंतर विठ्ठलाचे अभिषेक करण्यात आले व आकर्षक असा पेहराव करून सायंकाळी विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्यात आले कोरोना च्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर बंद असले तरी भाविकांना दर्शन मिळण्यासाठी मंदिर समितीने नवीन मोबाईल ॲप सुरू केला आहे या माध्यमातून जेथे असेल तेथे २४ तास भाविक, वारकरी, भक्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेऊ शकतात भाविकांना सुलभ व सोईचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समिती सदैव तत्पर असल्याचेही समितीचे कार्यकारी अधिकारी  विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.