परंडा तालुक्यात आढळले एकाच दिवशी 6 रुग्ण परंडा शहरात 4 तर नालगाव, आवार पिंपरी येथे प्रत्येकी 1 रुग्ण


परंडा :- जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज दि 4 रोजी परंडा तालुक्यातील 6 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये परंडा शहरातील 4 नालगाव  व आवार आवार पिंपरी येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे

   तालुक्यातील नालगाव येथे अगोदरच 1 रुग्ण सापडला असल्याने ते गाव प्रशासनाने  पूर्णतः सील केले अशीं आवार पिंपरी येथे नव्याने रुग्ण सापडल्याने आवार पिंपरी गावात जाणारे सर्व रस्ते प्रशासनाने सील केले असून गावातील किराणा दुकान,स्वस्त धान्य दुकान  पुढील येईपर्यंत तर दूध डेअरी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे गट विकासअधिकारी  रावसाहेब चकोर यांनी सांगितले
आज रुग्ण सापडतच आवार पिंपरी येथे प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अनिलकुमार हेळकर,पोलीस निरीक्षक आय एस सय्यद ,आरोग्य अधिकारी डॉ जे एन सय्यद  गट विकासअधिकारी रावसाहेब चकोर यांनी भेट देऊन पाहणी केली

परंडा शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यु
- इंगोले
 ,काव्हीड -१९ करोना या विषाणुजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन दि.05/07/2020 वार रविवार व दि.06/07/2020 वार सोमवार या दोन दिवस स्थानिक प्रशासनाद्वारे  जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे  या जनता कफ्युँ दरम्यान केवऴ दवाखाने ,मेडिकल्स ,दुध विक्रि दुकाने चालु  राहतिल.तेव्हा कोणीही विनाकारन घराबाहेर पडू नये असे आवाहन मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी केले आहे

No comments:

Post a Comment