माळशिरस तालुक्यात अकलूज, संग्रामनगर ,यशवंनगर व माळीनगर येथे आज प्रत्येकी एक कोरोना चे रुग्ण आढळल्याने प्रशासनाला अडचणीत आणणारे ठरले आहे. गेले तीन दिवस अकलुज मधील नागरिकांनी स्वतःहून बंद पाळून करोनाला अडवण्याचा प्रयत्न केला पण करोना अकलूजच्या शहरी भागात निघाल्याने नागरिक व प्रशासनात घबराट पसरली आहे. यामुळे आलेल्या पॉझिटिव्ह केस मुळे अजून किती जण संपर्कात आहेत हे आता पहावे लागेल .बोरगाव तालुका माळशिरस येथे काल सापडलेल्या पेशंटचे संपर्क बराच मोठा असल्याने प्रशासन तिकडे पळत असताना अकलूज परिसरात आज निघालेल्या चार कोरोना बाधित यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. प्रशासन आधीच अकलूजचा अनेक भाग सिल केले आहेत आता यशवंनगर चा भाग सील करण्याविषयी आदेश काढले ने जनतेत घबराट पसरली आहे. उद्यापासून सुरु होणारे दैनंदिन व्यवहार आता पुन्हा बंद होतील काय या विचाराने व्यापारी व नागरिक धास्तावले आहेत घरातील शिल्लक संपत आली आहे आता कोणी कोणाला मदत करण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे जर व्यापारी पेठ बंद झाली तर व्यापाऱ्यांनी बरोबर सामान्य माणूसही बेजार होणार आहे त्यामुळे प्रशासनाने या बाधित व्यक्तींना दूर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कडक उपाय करावेत अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे.
ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी
कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती
चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...

-
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस...
-
धाराशिव -महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या कार्यकारी अभियंत्याला मारहाण प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर पाटील यांच्यासह त्यांचा ...
-
राज्य सरकारने शासन निर्णय काढल्याने शिक्कामोर्तब मुंबई - पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत, सहकारी संस्थेत पद घेण्याबाब...