दैनिक जनमत : नगरसेवक तोफिक शेख यांचा जामीन अर्ज कोर्टाकडून मंजूर

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Thursday, July 30, 2020

नगरसेवक तोफिक शेख यांचा जामीन अर्ज कोर्टाकडून मंजूर



सोलापूर - एम आय एम चे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष तौफिक शेख यांचा जामीन अर्ज कर्नाटक उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे.
तौफीक शेख यांना कर्नाटक राज्यातील विजापूर पोलिसांनी रेश्मा पडगनूर खूनप्रकरणी अटक केली होती.

सामजिक कार्यकर्त्या रेश्मा पडगनूर यांचा गेल्या वर्षी विजापूर जवळ एका पुला खाली मृतदेह सापडला होता. पैसे देणे घेण्याच्या कारणावरून एक ऑडियो क्लिप व्हायरल केली होती. त्याचा मनात राग धरून तोफिक शेख यांनी पडेगणुर यांचा खून केल्याचा आरोप करत पडगनूर यांच्या पतीनी कर्नाटक पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यावरून तोफीक शेख यांना अटक करण्यात आली होती.
मात्र तोफिक शेख हे ज्या दिवशी घटना घडली त्या वेळी घटनास्थळी नसल्याचा युक्तिवाद  शेख यांचे वकील विशाल प्रताप सिंग यांनी  सर्वोच्च न्यायालयत केला.या खटल्यात कर्नाटक सरकार सरकार तर्फे मल्लिकार्जुन सावकार यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद तीन ते चार तास चालला. त्यानंतर उच्च न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. अशी माहिती तोफिक शेख यांचे वकील विशाल प्रताप सिंग यांनी दैनिक जनमत शी दूरध्वनीद्वारे बोलताना सांगितली.