दैनिक जनमत : लोहारा येथे अप्रमाणित औषधाचा साठा जप्त; उत्पादकावर होणार कारवाई!

Saturday, July 4, 2020

लोहारा येथे अप्रमाणित औषधाचा साठा जप्त; उत्पादकावर होणार कारवाई!


उस्मानाबाद - लोहारा येथील सुंदरम एजन्सी मध्ये अप्रमाणित औषधाचा साठा आढळून आला होता. अन्न व औषध प्रशासनाने तो साठा जप्त केला असून याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की लोहारा येथील सुंदरम एजन्सी ची नियमित तपासणी करत असताना एनझीमाॅल ड्रॉप या पोटफुगी दूर करणारे सुगंधी  औषधाच्या ८ बॉटल्स जप्त करण्यात आल्या होत्या १८ जून रोजी त्यांचा दर्जा अप्रमाणित असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला मिळाला त्यानुसार २९ जून रोजी उर्वरित २२ बॉटलस चा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. हे औषध अकोला येथील एलमेको या वितरकाकडून अकोला येथीलच  वितरकाकडून  लोहारा येथील लीबेन लाईफ सायन्सेस या मार्केटिंग आणि वितरण करणाऱ्या कंपनीला   मिळाले होते.त्यानंतर ते सुंदरम एजन्सी लोहारा यांना पुरवठा करण्यात आले होते. जी. एम.एच. लॅबोरेटरी, हिमाचल प्रदेश  ही या औषधाची उत्पादक कंपनी आहे. जी. एम.एच. लॅबोरेटरी १०७८० बॉटल उत्पादित केल्या होत्या त्यापैकी लीबेन ने पूर्ण १०७८० बॉटल खरेदी केल्या होत्या. आणि पुढे त्यातील ३२०० बॉटल एल्मेको कंपनीने खरेदी केल्या त्यातील ३० लोहारा येथे सुंदरम एजन्सी कडे वितरित करण्यात आल्या होत्या. तो साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. तसेच हे औषध अप्रमाणित दर्जाचे आढळून आल्याने ते बाजारातून परत मागविण्यात येत आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासन योग्य ती कार्यवाही करत असून खटला दाखल करण्यासाठी परवानगी मागविण्यात आली आहे. परवानगी मिळाल्यानंतर लोहारा येथील न्यायालयात खटला चालणार असल्याची माहिती अन्न व औषध निरीक्षक दुसाने यांनी दैनिक जनमतशी बोलताना दिली

या औषधाच्या खरेदीच्या पावत्या आमच्याकडे आहेत. हे औषध कोणत्याही मेडिकल मध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आले नव्हते. अशी प्रतकिया सुंदरम एजन्सी चे बिराजदार यांनी दैनिक जनमत शी बोलताना दिली.